रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाटाव आदिवासी वाडी इयता 1 ली ते 5 वी गटात सांस्कृतिक सन २०१९ -२०२० कार्यक्रमामध्ये धाटाव केंद्रात प्रथम क्रमांक मिळाले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुरेश राठोड व उपशिक्षिका श्रीम. सोनाली राख यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत.शाळेचा पट 28 असून 26 विद्यार्थी रोज उपस्थित असतात.शालेय पोषण आहारात भाजीपालाचा वापर केला जातो,कोबी, टोमॅटो, बटाटा, कडधान्य दर शनिवारी बिस्किटे अशा प्रकाचं सकस आहार दिला जातो.तशी ही शाळा रोहा शहराच्या जवळ साधारण 6 किलोमीटर अंतरावर आहे.शाळेत 100% आदिवासी कातकरी समाजातील पोरं.MIDC भागात ही शाळा आहे.सदर शाळेसाठी यशवंत ग्रामपंचायत धाटाव मोठ्या प्रमाणात वेळोवेळी मदत करते. पेन,पेन्सिल,वर्षभरासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्य वह्या,कपडे,भौतिक सुविधा,रंगरंगोटी सर्व प्रकारची मदत ग्रामपंचायत कडून मिळते. शाळेची लेझीम पथक,घुंगरू काठी,सहशालेय उपक्रम परिसर भेट,स्वच्छता,दर शनिवारी दप्तरविना शाळा व योगासने सूर्यनमस्कार इत्यादी उपक्रम घेतल्या जातात. शाळा डिजिटल असून रोज दुपार सत्रात E-Learning द्वारा अध्यापन केले जातात.शाळेस केंद्रप्रमुख साहेब सन्मा. श्री गायकर सर, विस्तार अधिकारी, साधनयक्ती मार्गदर्शन करतात.
शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक,शिक्षण प्रेमी वेळोवेळी मदत करतात.
